.विनाशकारी दंगली पासुन बोध कधी घेणार ..."
..भिमा - कोरेगांव दंगलीतुन आपण काय बोध घेतोय का?की काही दिवस वर्तमान पत्राचे रकाने वाचण्या पलीकडे आणि दूरचित्रवाणी वर ब्रेकिंग न्युज पहाण्या पलिकडे आपली मानसिकता जात नाही आहे का ?.
समाजात विविध जाती - धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहात असताना . त्यात प्रत्येक जाती धर्माला काहीतरी पुर्व इतिहास आहेत. म्हणून त्याचा प्रत्येकाने बागुलबुवा करुन शौर्य दिन ,बलिदान दिन ,अस्मिता दिन ,यल्गार दिन इत्यादी " दीन...? " साजरे करुन इतर जाती -धर्माची निर्भत्सना आणि विटंबना करण्याचे पातक करावे का ? याचा प्रत्येकाने आता विचार करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रा साठी, नोकरी धंद्यासाठी आणि मीठ- भाकरी साठीची आंदोलने कालबाह्य होताना दिसताहेत याचे दु:ख होते आहे .
...खरेतर " आरक्षण " नावाचे "मधाचे बोट " कडवट झाले पाहीजे तर आणि तरच जाती - धर्मातील राजकारण आणि दुही नष्ट होतील. देश स्वातंत्र्याची शंभरी गाठत असताना आजही आपण जाती - धर्माच्या जाखड शृंखलेत अडकलो हि "शृंखला" कधी तुटणार त्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. नाहीतर भविष्यात पुढील पिढीचे अस्तित्व " जात - धर्म " नावाच्या युद्धात नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते .
- मंगेश धोंडी गावडे ,
भांडुप , पुर्व
No comments:
Post a Comment